आपला जनसेवक म्हणून मागील पाच वर्ष काम केले : क्रीडा मंत्री संजय बनसोडे
*उदगीर* : उदगीर जिल्हा निर्मिती करण्यासाठी सर्व सुविधायुक्त कार्यालये उभारले असून प्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यान्वित करुन एम.एच.५५ हा आपला नंबर आणुन उदगीर जिल्ह्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आपण टाकले असून येत्या काळात महाराष्ट्रात जेव्हा छोट्या - छोट्या जिल्ह्याची निर्मिती होईल तेव्हा आपल्या उदगीर चे नाव पहिल्या नंबरला असेल. मतदार संघात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आदी सहभौतिक सुविधा पुरविल्या असुन मागील ५ वर्षाच्या काळात मी केवळ आपला जनसेवक म्हणून काम केले असल्याचे मत क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते कौळखेड रोड वरील शिवम फंक्शन हाॅल येथे आयोजीत महायुतीच्या विजय संकल्प मेळाव्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी पक्ष निरीक्षक हरिशजी कोटवाले, माजी आ.गोविंदराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, व्यंकट बेद्रे, भगवान पाटील तळेगावकर, अॅड.गुलाबराव पटवारी, राहुल केंद्रे, धर्मपाल नादरगे, रामचंद्र तिरुके, सिद्धेश्वर पाटील, समीर शेख, रामराव राठोड, भरत चामले, गोपाळ माने, देविदास काळे, उत्तरा कलबुर्गे, दिपाली औटे, अमोल निडवदे, अर्जुन आगलावे, ब्रम्हाजी केंद्रे, श्याम डावळे, प्रविण भोळे, शिवशंकर धुप्पे, मनोज पुदाले, प्रभावती कांबळे, साईनाथ चिमेगावे, बालाजी भोसले, वसंत पाटील, सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, अनिल मुदाळे, विजय निटुरे, उदय मुंडकर, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, उदगीर मतदार संघातील जळकोट तालुका हा डोंगरी तालुका म्हणून परिचित होता. या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती व्हावे म्हणून तिरु नदीवर कोट्यावधी रुपये खर्च करून सात बॅरेजेसची निर्मिती केली या बेरजेसमुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती होईल आणि या भागातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार असल्याचे सांगून पाण्याचा प्रश्न गंभीर होता म्हणून मराठवाड्यातील एकमेव वॉटर ग्रीड योजना ही केवळ आपल्या मतदारसंघात मंजूर करून आणली आज त्याचे काम प्रगतीपथावर आहे. सर्व जाती धर्माला न्याय देण्यासाठी विविध सभागृह उभारले या भागातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारले आहेत. उदगीर व जळकोटला एम.आय.डी.सी मंजूर केली असुन भविष्यात येथे मोठे उद्योग आणुन येथील बेरोजगारी मिटवणार आहे. उद्योगाबरोबरच विमानतळ व
मेडिकल काॅलेज उभारणार असून उदगीरला स्मार्ट शहर करण्याचे आपले स्वप्न भविष्यात आपण उदयगिरी बाबांच्या नावाने वंदे भारत ट्रेन करणार असुन या भागातील जनतेच्या मागणीनुसार बिदर - मुंबई रेल्वे नियमित करणार असल्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी महायुतीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त करुन ना.संजय बनसोडे यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
*************************
0 Comments