महाविकास आघाडीचा उदगीरात कार्यकर्ता निर्धार मेळावा
उदगीर, प्रतिनिधी
उदगीर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर संग्राम भालेराव यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता निर्धार मेळावा संपन्न झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर भालेराव यांचा उदगीर विधानसभेचा उमेदवारी अर्ज दि. 29 ऑक्टोबर 2024 रोजी मोठ्या उत्साहात भरला जाणार आहे. मतदार संघातील प्रत्येक गावांमधून गाव, वाडी वस्तीतून कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुधाकर भालेराव यांच्या प्रचारार्थ उदगीर शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर जाहीर सभा संपन्न होणार आहे. या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते, कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित (दादा) पवार, काँग्रेस नेते, माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख वरिष्ठ यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यकर्ता निर्धार मेळाव्याला बसवराज पाटील नागराळकर, शिवाजीराव हूडे, कल्याण पाटील, शिवाजीराव मुळे, मधुकर एकुरगेकर, चंद्रप्रकाश खटके, मंजूरखा पठाण, चंद्रकांत टेंगेटोल, दत्तात्रय काकडे, श्रीमंत सोनाळे, अजित शिंदे, श्रीकांत पाटील, चंदन पाटील नागराळकर, सय्यद सरदार अली, हमीद शेख, अनिल पंचाक्षरी, सरोजा बिराजदार, संजय पवार, नेमीचंद पाटील, संतोष बिराजदार, अजित पाटील तोंडचिरकर, बसवराज पाटील मलकापूरकर, सोनहिरे मामा, धोंडीराम पाटील, निशांत वाघमारे, शशिकला पाटील, राजश्री मठपती, शमशुद्दीन शेख, मेहबूब शेख, लक्ष्मण बतले, गजानन सताळकर, वर्षाराणी धावारे, माधव कांबळे, नाना ढगे, सलीम सय्यद, अंकुश कोनाळे, प्रकाश हैबतपुर,सचिन साबणे, युवराज जोमदे, शंकर मुक्कावार, ज्ञानेश्वर पाटील, सचिन केंद्रे, पद्माकर उगिले, राजाभाऊ केंद्रे, अजीम दायमी, राजकुमार देशमुख, वसंत शिरसे, अहमद सरवर, डॉ.अंजुम कादरी, मारुती पांडे, दत्ता सुरनर, धनराज केळगावे, दयानंद रोडगे, बालाजी पाटील, मुक्तेश्वर पाटील, नितीन धूळशेट्टये, प्रकाश हैबतपुर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments