दारुड्या मुलांकडून जन्मदात्या आईची निर्घृण हत्या.
गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला गावातून एक भयावह आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका ५४ वर्षीय व्यक्तीने आपल्या ७५ वर्षीय वृद्ध आईची कुऱ्हाडीने हत्या केली आणि त्यानंतर स्वतः विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या दुहेरी मृत्यूने परिसर हादरून गेला असून, गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मृतक आईचे नाव सुलकनबाई बनोठे (वय ७५) असून, आरोपी आणि आत्महत्याग्रस्त मुलाचे नाव लेखराज बनोठे (वय ५४) आहे. दोघेही एकत्र राहत होते. शुक्रवारी रात्री लेखराजने दारू पिण्यासाठी आईकडे पैसे मागितले. मात्र, सुलकनबाई यांनी पैसे देण्यास नकार दिला. पैसे न मिळाल्याने संतापलेल्या लेखराजने कुऱ्हाडीने आईच्या डोक्यावर वार केला, ज्यामुळे सुलकनबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
0 Comments