Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*जेष्ठ पत्रकार बालासाहेब शिंदे यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जाहीर*

*जेष्ठ पत्रकार बालासाहेब शिंदे यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जाहीर*

*उदगीर प्रतिनिधी* 
उदगीर:निस्वार्थी जनहित बहु.संस्था सावली, जिल्हा चंद्रपूर द्वारा संचलित व आरटीआय, माहिती अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आरटीआय, माहिती अधिकार उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार अतनूर तालुका जळकोट जिल्हा लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार दैनिक " पुण्यनगरी " चे प्रतिनिधी बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. माहिती अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष अजय तुम्मे यांनी पुरस्काराची घोषणा केली असून दैनिक पुण्यनगरी चे अतनूर प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार बालासाहेब गोविंदराव शिंदे यांना पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील तसेच माहिती अधिकार, आरटीआय क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ दि.३० नोव्हेंबर व दि. ०१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ः०० वाजता. माहिती अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साई आश्रम २ , धर्मशाळा जुन्या कॉलेज जवळ, हेलीपॅड रोड कातोरे वस्ती, नवीन भोजनालयाच्या पाठीमागे निमगाव, शिर्डी येथे राज्यव्यापी दोन दिवसीय महा अधिवेशनात दिला जाणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्वान व्यक्तींना या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांचा समावेश आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
हा पुरस्कार शासकीय व निमशासकीय कार्यालयात तथा विद्यालय व महाविद्यालयात माहिती मागून माहिती अधिकार कायदा २००५ चा योग्य वापर करून योग्य माहिती मिळवून जनतेत जनजागृतीचे उत्तम कार्य केले असल्याने माहिती अधिकार संघर्ष समितीच्या वतीने आरटीआय उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. माहिती अधिकारात उत्तम कामगिरी केली असल्याने संस्थापक अध्यक्ष अजय तुम्मे संस्था सचिव सौ.गायत्री अजय तुम्मे यांनी कळविले आहे. हा पुरस्कार माहिती अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या महाअधिवेशन महामेळाव्यात क्रीडा व योग सेवा नागपूरचे उपसंचालक चंद्रशेखर पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रपूरचे विकास राचेलवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी विनोद भाऊ ठिकरे, रुग्णहक्क परिषदेचे मुंबई अध्यक्ष धनंजय पवार, यशदा पुणे येथील आरटीआय टीचर ऑफ ट्रेनर पुण्याचे सादु दादू भोसले, श्री.साई संस्थान शिर्डीचे सदस्य व पदाधिकारी यांच्या हस्ते शिर्डी येथे निःशुल्क व मोफत दोन दिवशीय महा राज्यव्यापी महामेळाव्यात बालासाहेब शिंदे यांना हा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात