अहमदनगर येथे 14 ते 27 डिसेंबर दरम्यान सैन्य भरती
लातूर, दि. 4 जिमाका: पुणे येथील मुख्यालय सैन्य भरती कार्यालयामाफ्रत 14 ते 27 डिसेंबर, 2024 या कालावधीत अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे व सोलापूर या सहा जिल्ह्यातील नव यवुकांसाठी सैन्य भरती मेळावा मेकनाईज इंफंट्री सेंटर व स्कूल ( अहमदनगर) येथे आयोजित केलेला आहे. याकरिता लातूर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी सदरील सैन्य भरती मेळाव्यात सहभाग नोंदवून जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल शरद पांढरे (नि) यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.


0 Comments