वेगवेगळ्या प्रकरणामुळेच कायदे तयार होतात,न्यायधीश बि.आर.झेंडे यांचे नागलगाव येथे प्रतिपादन
उदगीर:देशात घडत असलेल्या वेगवेगळ्या प्रकरणामळेच नवनवीन कायदे तयार होतात म्हणून नागरिकांनी आपल्या गावातील वाद, नातेवाईकांतील वाद,घरातील कौटुंबिक वाद हे आपल्या घरात, गावातच मिटवले तर नविन कायदे तयार करण्याची गरज पडत नाही,असे प्रतिपादन उदगीर दिवाणी न्यायालयाचे न्यायधीश बी.आर.झेंडे यांनी उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आयोजित केलेल्या साक्षरता शिबिराच्या कार्यक्रम प्रसंगी १५ डिसेंबर रोज रविवारी सकाळी ११ वाजता बोलताना केले.पुढे बोलताना न्यायधीस म्हणाले की कोणत्याही प्रकारचा एखादा वाद झाल्यास न्यायालयात अथवा पोलीस ठाण्यात न जाता चार भिंतीच्या आत मिटवून आपल्या घरापासून याची सुरुवात केल्यास देशात नवनवीन कायदे करण्याची गरज पडणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे असेही ते बोलताना सांगितले.यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ऍड बि.एम.वलांडीकर,सचिव ऍड एस.एस.हुल्ले,ऍड एस.टी.पाटील,बी.व्ही.पाटील,ऍड बी.पी.नवटक्के,ऍड जे.बि.भाले,ऍड एम.के.मळभागे,ऍड डी.एम.पाटील,ऍड सागर बिरादार, सरपंच सुभाष राठोड,ग्रामविकास अधिकारी रोडेवाड,पोलीस पाटील अंकुश वाघे,प्राचार्य सूर्यकांत चवळे,अनिल गुरमे,गोविंद पाटील, बाबुराव पाटील वाडीकर,संगमेश्वर शेरे,आदी गावातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments