परभणी येथे झालेल्या घटनेचा भिम आर्मीने केला निषेध, दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
उदगीर: परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची तोडफोड करणाऱ्या व्यक्तिवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी उदगीर तालुका भीम आर्मीच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.या घटनेमागील सूत्रधारांचा शोध लावून त्यांच्या विरोधात देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत,आंबेडकरी वस्त्यां मधील पोलिसानी चालविलेले निरपराध युवकांचे कॉम्बिग ऑपरेशन त्वरित थांबवावे.अटक केलेल्या निरपराध भीम सैनिकांची त्वरित सुटका करण्यात यावी, संविधानाच्या जनजागृतीसाठी राज्यभर विशेष अभियान सुरु करावे ,भारतीय संविधानाचा अभ्यासक्रमात समावेश करावा अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी भिम आर्मी तालुकाअध्यक्ष आकाश करतुरे, शहराध्यक्ष राहुल कांबळे, राम दादा शिंदे, प्रतिक कांबळे, सुरेष वाघमारे , अभय गायकवाड, संतोष वाणखेडे, वैभव गायकवाड, अभिजीत शिंगे, करण कांबळे, अभिजीत वरदाळे, राहुल कांबळे,राज मलकापुरकर, सायबा गंडारे, भैय्या चौधरी, दिनेश वासरे, पापा बनशेळकीकर,शिध्दोधन पकोळे,गोटू जामकर,मोहन गंडारे,आदी उपस्थित होते ,
0 Comments