Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. टी. व्ही. पाटील यांना सेवापूर्ती निरोप

प्रा. टी. व्ही. पाटील यांना सेवापूर्ती निरोप 

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर:शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, हंडरगुळी येथील एच. एस. सी. व्होकेशनल विभागात कार्यरत असलेले पूर्णवेळ शिक्षक प्रा. टी. व्ही. पाटील हे नियत वयोमानानुसार 26 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले असून त्यांना किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर व शिवाजी शिक्षण संकुलाच्या वतीने भरगच्च कार्यक्रमात सेवापूर्ती सत्कार करून निरोप देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
संस्थेचे सहसचिव हिरागिर सिद्धगिर गिरी, संचालक रामराव एकंबेकर, तालुका कॉंग्रेस (आय) कमिटीचे उदगीर अध्यक्ष कल्याणराव पाटील, संस्थेचे अधीक्षक डी. पी. सूर्यवंशी, सत्कारमूर्ती प्रा. टी. व्ही. पाटील, त्यांच्या पत्नी रेखाताई पाटील, मुख्याध्यापक आर. एम. सय्यद, लातर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे  बॅंकेचे उप महाव्यवस्थापक बी. व्ही. पवार, प्रा. विश्वास आळंदीकर, बजरंग शाहीर, गौतम सोनकांबळे, सतीश काळे, माजी मुख्याध्यापक रामभाऊ हाडोळे, मुख्याध्यापक एस. आर. जाधव, मुख्याध्यापक एन. बी. हक्के, माजी मुख्याध्यापक एस. पी. धुमाळे, पर्यवेक्षक बी. व्ही. बिरादार हे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
 यावेळी त्याना भेटवस्तू, पूर्ण आहेर, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेतर्फे व मित्रमंडळ, स्नेही, हितचिंतक यांच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक आर. एम. सय्यद यांनी प्रास्ताविकपर भाषणात प्रा. टी. व्ही. पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. प्रा. आर. व्ही. घटकार यांनी मनोगत व्यक्त केले. कल्याणराव पाटील, रामराव एकंबेकर यांनी आपल्या भाषणात प्रा. पाटील यांचे कौतुक केले.
 यावेळी रामभाऊ हाडोळे, एन. बी. हक्के, एस. पी. धुमाळे यांचीही भाषणे झाली. प्रा टी. व्ही. पाटील यांनीही काळजाला भिडतील अशा भावना सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन ए. एस. मोमीन यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक बी. व्ही. बिरादार यांनी केले. या भव्य निरोप समारंभास पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात