महिला रुग्णालयात रक्त देईपर्यंत; पाॅकेटमधील दिड तोळे सोने व रोख रक्कम पळविली..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर शहरातील बसस्थानक समोरील गल्लीत असलेल्या श्रीकृष्ण क्लिनिक मध्ये मधुमेहाची रक्त तपासणीसाठी आलेल्या वयोवृद्ध महिला ही रक्त देईपर्यंत तिच्या पाॅकेटमधील दिड तोळे सोन्याचे दागिने व २ हजार रोख रक्कम पळविली. याप्रकरणी शुक्रवारी (६ डिसेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ६ डिसेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास बोरोळ (ता.देवणी) येथील फिर्यादी वयोवृद्ध महिला उदगीर शहरातील श्रीकृष्ण क्लिनिक यांच्या रुग्णालयात मधुमेह रक्त तपासणीसाठी आली असता ती रक्त देईपर्यंत तिच्या पाॅकेटमधील एक तोळ्याची बोरमाळ, ज्याची अंदाजे अकरा वर्षापूर्विची जूनी किंमत २० हजार रुपये. व पाच ग्रॅमचे मणी, व आर्धा ग्रॅमचे मंगळसूत्र जूने वापरते सहा वर्षापूर्विचे अंदाजे किंमत ६ हजार रुपये व नगदी रोख २ हजार रुपयांसह असे एकुण २८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने कोनीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले आहे.
याप्रकरणी संगीता मारोती कोयले (वय:६५ वर्षे, रा. बोरोळ ता. देवणी) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल पुठ्ठेवाड हे करीत आहेत.
0 Comments