श्रीगुरू हावगीस्वामी महाराज यात्रा महोत्सवानिमित्त उदगीर येथे १५ जानेवारी रोजी भव्य पशू व पक्षी प्रदर्शन
बुधवार, १५ जानेवारी २०२५ रोजी भव्य पशू व पक्षी प्रदर्शनाचे उदगीर शहरातील तळवेस येथील मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी पशू नोंदणी व प्रदर्शनाचे उद्घाटन १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होईल.
या पशू प्रदर्शनात देशी गोवंश (देवणी व लाल कंधारी), संकरीत गोवंश, उस्मानाबादी शेळी, अश्व व कुकुट पक्षी मोठ्या संख्येने सहभागी होतात. तसेच पशुपालकांना योग्य मार्गदर्शन होण्यासाठी पशू पालनासंबंधी माहिती देणारे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. तरी सर्व पशुपालकांनी आपल्या जातीवंत पशुधनासह या भव्य पशू व पक्षी प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन उदगीर पंचायत समिती पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
0 Comments