मनोज पुदाले यांनी काढलेल्या दिनदर्शिकेचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विमोचन
उदगीर : येथील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
शिवाय मागच्या वर्षभरात उदगीर भाजपच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती या दिनदर्शिकेतून देण्यात आली आहे. अतिशय सुंदर अशी दिनदर्शिका प्रकाशित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.
यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, दत्तजी पाटील, प्रशांत रंगवाळ, यांची उपस्थित होते.
0 Comments