प्रजासत्ताक दिनी चोंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संगणक संच भेट
उदगीर:तालुक्यातील चोंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला प्रजासत्ताक गणराज्य दिनी चोंडीचे सरपंच विठ्ठलराव पाटील यांनी संगणक संच भेट दिली,शाळेत प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार मोरखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.प्रजासत्ताक दीना निमित्त शाळेत घेतलेल्या खेळाचे बक्षीस वितरण शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष,व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.सुत्रसंचलन श्री सोमवंशी सर यांनी केले तर आभार श्री गायकवाड एस.जी.यांनी मांडले.
0 Comments