Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

निडेबन येथे घरफोडी; सोन्याच्या दागिनेसह रोख रक्कम ४ लाख ९१ हजार पळविले..

निडेबन येथे घरफोडी; सोन्याच्या दागिनेसह रोख रक्कम ४ लाख ९१ हजार पळविले..

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा..

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर शहरातील निडेबन येथील सरस्वती काॅलनी येथे एकाच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे २ लाख ११ हजार रुपयांची दागीने व रोख २ लाख ८० हजार असे एकुण ४ लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरून घेऊन गेले. याप्रकरणी रविवारी (२६ जानेवारी) उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २२ ते २४ जानेवारी दरम्यान निडेबन येथील सरस्वती काॅलनी येथे विजयकुमार अजने यांच्या घरी भाड्याने राहत असलेले  नरसिंग बाबुराव कृष्णापुरे यांच्या घराचे कोंडी व कुलूप घराचे कुलुप कोंडा तोडुन घरातील कपाट तोडुन रोख २ लाख ८० हजार व ५३ हजार रुपयाचे एक तोळा सोन्याची अंगठी, ३४ हजार रुपयांची ५ ग्राम सोन्याची अंगठी, ७८ हजार रुपयांची एक तोळा कानातील सरपाळे, ४६ हजार रुपयांची ३ ग्रामच्या २ सोन्याचे अंगठ्या असे रोख व सोने मिळून एकुण ४ लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरून घेऊन गेले आहे.
याप्रकरणी नरसिंग बाबुराव कृष्णापुरे (रा.धोंडवाडी ता. जळकोट  ह.मु सरस्वती कॉलनी निडेबन ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुपमा केंद्रे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात