उदगीरात भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ
उदगीर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य पातळीवर पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान सुरू आहेत आज पाच जानेवारी आज ( दि.5 जानेवारी) राज्यभरात एकच दिवशी 25 लक्ष सदस्य करण्याचे उद्देश ठेवण्यात आला होता.उदगीर शहरात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पक्ष सदस्य नोंदणी कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, धर्मपाल नादरगे,बस्वराज पाटील कवळखेडकर , बस्वराज रोडगे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे,ऍड. दत्ताजी पाटील, विजय निटुरे, रामचंद्र मुक्कावार, बापूराव यलमटे, आनंद बुंदे, साईनाथ चिमीगावे, लखन कांबळे, मनोहर भंडे, बालाजी गवारे, रामेश्वर चांडेश्वरे, सरोजा वारकरे, उषा माने, मंदाकिनी जीवने, श्यामला कारामंगे, शिवकर्णा अंधारे, आनंद साबणे, राहुल आंबेसंगे, प्रशांत रंगवाळ, पप्पू गायकवाड, मारोती कोटलवार अनिल मुदाळे, चेतन सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, कंवर सकट, सुनील गुडमेवार, अमर सूर्यवंशी, राहुल आपटे, विवेकानंद जाधव, राजू अंधारे,संजय पाटील, प्रथम वीरशेट्टी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आज रविवारी देशभरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणी सुरू झाली असून त्याचाच भाग म्हणून या मोहिमेचा उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती शहराध्यक्ष मनोज पुदाले यांनी दिली. आज राबविलेल्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला असून आगामी काळात शहरातील सर्वच चौकात स्टेज उभारून हे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातून सर्वाधिक नोंदणी उदगीर शहरातुन करण्यासाठी आम्ही भाजपचे सर्व पदाधिकारी संघटितपणे काम करणार असल्याचे ही मनोज पुदाले यावेळी म्हणाले.
माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यावेळी म्हणाले की, आजच्या सदस्य नोंदणीचा नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहिला असता भाजपवरील असलेला लोकांचा विश्वास यातून दिसून येतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाधिक नोंदणी करण्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करावे असे आवाहन यावेळी बागबंदे यांनी केले.
0 Comments