मनोज जरांगे पाटील व अंजली दमानिया यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एन सीआर दाखल
उदगीर:मनोज जरांगे पाटील व अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाच्या नेत्यांना व समाजाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ८ जानेवारी रोज बुधवारी अडीच वाजेच्या दरम्यान एनसीआरची नोंद करण्यात आली आहे,थोडक्यात माहिती अशी की चार जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता परभणी येथे जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय हेतूने जातीय तेढ निर्माण करणारे व्यक्तव्य केल्याने वंजारी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, समाजामध्ये अशा वक्तव्यामुळे तनावपूर्वक वातावरण निर्माण होऊन शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे, बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती अतिशय वाईट घटना आहे,संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्याना कठोर शिक्षा व्हावी परंतु या घटनेच्या आडून मनोज जरांगे पाटील व अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाबद्दल तसेच वंजारी समाजाचे मंत्री धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे, समाजातील अधिकारी व कर्मचारी यांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत आहेत, गोविंद नरहरी घुगे व सकल ओबीसी समाज यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील,व अंजली दमानिया यांच्यावर ३५२,३५१ (२) ३५१ (३) ३ (५) भारतीय न्याय संहिता नुसार एनसीआरची नोंद करण्यात आली आहे.सहा जानेवारी रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर मनोज जरांगे पाटील व अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वंजारी समाजाने पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले होते.
0 Comments