Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*केंद्रीय पत्रकार संघाकडून आटपाडीचे अशोक पवार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर*

*केंद्रीय पत्रकार संघाकडून आटपाडीचे अशोक पवार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर*

येत्या शुक्रवारी विश्रामबाग सांगलीत रंगणार पत्रकारांचा सन्मान सोहळा आणि पार पडणार पत्रकारांसाठी कार्यशाळा.

आटपाडी: एन.एम.न्युजचे संपादक अशोक पवार यांना केंद्रीय पत्रकार संघाकडून आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, हा पुरस्कार सन्मान सोहळा १० जानेवारी रोजी सांगलीत विश्रामबाग येथील रोटरी हॉलमध्ये  पार  पडणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री सत्यजित देशमुख उपस्थित राहणार आहेत,तर प्रमुख पाहूणे म्हणून आमदार श्री इद्रीस नायकवडी,केंद्रीय पत्रकार संघाचे
राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीपजी कसालकर,सा.मि.कु.मनपा उपायुक्त श्री वैभव साबळे,दै लोकमतचे संपादक श्री हणमंत पाटील,टिळक महाराष्ट्र  विद्यापीठ समन्वयक डॉ हेमंत मोरे,सांगली आकाशवाणी कार्यालय प्रमुख श्रीनिवास जरंडीकर, संपादक दै बंधुता श्री अमरसिंह देशमुख या मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श पत्रकार पुरस्काराचे वितरण होणार आहे.हा कार्यक्रम दोन सत्रात होणार असून सकाळी ११ ते १ यावेळेत मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व आदर्श पत्रकार १)सुनील माने, उपसंपादक, दै पुढारी,१) विकास शहा, दै लोकमत ,३)मोहनराव राजमाने दै नवराष्ट्र (डिजिटल) ४)मोहनराव मोहिते दै लोकमत,५) अशोक पवार ( संपादक NM NEWS)  तर  जलसंधारण व वृक्षलागवड साठी काम करणारे आदर्श समाजसेवक   श्री सुनील पाटील आणि आदर्श शिक्षिका  श्रीमती मनिषा प्रकाश संकपाळ जि. प. शाळा मदनेवस्ती कंठी  ता जत  या सर्वांचा सन्मान होणार आहे.यानंतर  दुपारी २ ते ४ पत्रकारिता तज्ञ  पत्रकाराना मार्गदर्शन करणार आहेत. याचे संयोजन  राज्य,आणि जिल्हा केंद्रीय पत्रकार संघ, आणि सा. मि.कु.मनपा करणार असल्याचे केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र लोंढे व सचिव महेश भिसे यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात