Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

गुरदाळ येथील खुन प्रकरणात १२ ओरोपींना जन्मठेपेची शिक्षा..

गुरदाळ येथील खुन प्रकरणात १२ ओरोपींना जन्मठेपेची शिक्षा..

जिल्हा व सत्र न्यायाधीश उदगीर, श्रीमती आर.एम. कदम यांच्या न्यायालयाचा निकाल..

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील गुरदाळ येथे सदर गुन्ह्यातील १३ आरोपीने राजकीय शत्रुत्व व वैयक्तिक द्वेषातून २३ मे २००३ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास फिर्यादीचे वडील हे घरी जेवन करीत असताना डोक्यात काठीने हल्ला करुन खुन केल्या प्रकरणी शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आर.एम.कदम यांनी सदर गुन्ह्यातील एक मयत वगळून १२ आरोपींना कलम ३०२ भादवि प्रमाणे सश्रम जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावले आहे.

     याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील गुरदाळ येथे २३ मे २००३ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास दिगंबर यशवंतराव पाटील (वय ५८ वर्षे) हे घरी जेवन करीत असताना सदर गुन्ह्यातील आरोपींनी संगनमत करुन घरात घुसून राजकीय शत्रुत्व व वैयक्तिक द्वेषापोटी दिगंबर पाटील हे त्यांच्या घराच्या ओसरीत जेवताना त्यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली. व त्यांना खेचून आणून प्रचंड असा लाठी हल्ला करीत त्यांचा जागीच खुन केला. व त्यांच्या घरातील इतर लोकांना व नातेवाईकांना जबर जखमी केले.

याप्रकरणी मयताचा मुलगा बस्वराज दिगंबर पाटील यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.६०/२००३ कलम ३०२, १४७, १४८, १४९, ४५२, ३२३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. सदर प्रकरणात पोलीसांचे वतीने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उदगीर येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सदरील सत्र खटल्याची सुनावणी पिठासन अधिकारी सत्र न्यायाधीश श्रीमती आर.एम.कदम यांच्या न्यायदालनात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सरकार पक्षाने एकुण १३ साक्षिदारांची साक्ष नोंदविली. तर बचाव पक्षाचे वतीने ६ साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणी दरम्यान एकुण१३ आरोपी पैकी एका आरोपीची मृत्यू झाला. संचिकेतील कागदपत्रांच्या अनुषंगाने सहाय्यक सरकारी वकील अॅड. गौसपाशा सय्यद यांनी सविस्तर असा युक्तीवाद सादर केलेल्या बाबींवर मे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उदगीर येथील पिठासन अधिकारी सत्र न्यायाधीश श्रीमती कदम यांनी शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) रोजी सायंकाळी उशिरा सदर गुन्ह्यातील १)शिवराज हणमंतराव पाटील, २)दिलीप शिवराज पाटील, ३)रामराव भगवंतराव उजळंबे, ४)शंकर विठ्ठलराव पाटील, ५)माधव राजेंद्र शिंदे, ६)संजय शिवराज पाटील, ७) राजकुमार शिवराज पाटील, ८) राजेंद्र बाजीराव शिंदे, ९) विनायक हणमंतराव पाटील, १०) रतिकांत विनायक पाटील, ११) मारोती दौलतराव बिरादार, १२) विजयकुमार शिवराज पाटील, १३) विठ्ठल माधवराव पाटील (सर्व रा.गुरदाळ ता.उदगीर) या १२ आरोपीला कलम ३०२ भादवि प्रमाणे आरोपीस सश्रम जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला. व तसेच दंड नाही भरल्यास आणखीन एक वर्ष कारावास व तसेच सर्व आरोपींना कलम ४५२, सह १४९ नुसार ७ वर्षे कारावास व प्रत्येकी १ हजार रुपये दंड, दंड नाही भरल्यास आणखीन ६ महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. व तसेच सर्व आरोपींना कलम १४७, १४९ नुसार एका वर्षाचा साधा कारावास आणि सर्व आरोपींना कलम १४८ सह १४९ नुसार एक वर्षे कारावास व तसेच आरोपी क्र.३,४८,९,११,१२ यांना कलम ३२३ सह १४९ नुसार एका वर्षाचा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

सदर प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील अॅड. गौसपाशा सय्यद यांना अॅड. शिवकुमार गिरवलकर, अॅड. एस. आय. बिराजदार, अॅड, बालाजी शिंदे, अॅड. प्रभुदास सुर्यवंशी यांनी सहकार्य केले. व तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हेडकाँस्टेबल अक्रम शमशोदिन शेख यांनी सहकार्य केले.

■ उदगीर न्यायालयाला छावणीचे स्वरूप

उदगीर तालुक्यातील गुरदाळ येथील खुनाच्या घटने संदर्भात त्या काळात खुप चर्चेला उधाण आले होते. सदर प्रकरणात प्रारंभी सरकारी वकील म्हणून नामवंत सरकारी वकील उज्वल निकम यांनी हजेरी लावली होती. सदर खटल्याचा शुक्रवारी निकाल लागणार असल्याने न्यायालय परिसरात नागरिक, नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष स्काडसह पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आर.एम.कदम यांच्या उपस्थितीत न्यायालयाचे कामकाज रात्री आठ वाजे पर्यंत सुरू होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात