राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
उदगीर :- राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत गाडगे महाराज चौक शेतकी निवास उदगीर येथे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला राष्ट्रसंत गाडगे महाराज एक समाज सुधारक समाजातील अनिष्ट चालीरीती व प्रचलित अंधश्रद्धा वर प्रहार करून शिक्षणाची कास धरण्याचा उपदेश करणारे विज्ञानवादी संत होय. मंदिरात देव राहत नसून पुजाराचे पोट राहते दगडात देव शोधण्यापेक्षा माणसातील देव ओळखा असा मानवतावाद मांडणारे तसेच अंधश्रद्धेत गुरफटून राहण्यापेक्षा कर्म मार्गावर चालण्याचा तसेच संपूर्ण मानव जातीस स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या गाडगे महाराजांची आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळेस उपस्थित मान्यवर संजय भाऊ राठोड मनसे जिल्हाध्यक्ष .डॉक्टर शरद कुमार तेलंगाने ज्येष्ठ नेते. विनोद तेलंगे प्रहार जिल्हा उपाध्यक्ष .अमोल गाजरे धोबी समाज अध्यक्ष. प्रशांत शिंदे. संतोष गाजरे .बालाजी भालेराव. महादेव गाजरे. विजय तेलंगे. रवी कुमार देगलूरे. डेबू भालेराव. आकाश भालेराव. आशिष भालेराव. रामराज मोरे .व समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments