हकनकवाडी पाटीवर एसटीच्या महिला कंडक्टरास मारहाण..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील हकनकवाडी पाटीवर एसटी बसमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या महिला कंडक्टरास एका प्रवाशांने शिविगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरुध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास हकनकवाडी पाटीवर एसटी बसमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या महिला कंडक्टरास आरोपीने फिर्यादी हे शासकीय बस क्र.एम. एच. १४ बी.टी.१६६४ मध्ये तिकीट काढण्याचे शासकीय कर्तव्य बजावत असताना कंडक्टरास हाताने कपाळावर मारून शिवीगाळ करून कर्तव्या पासून परावृत्त केले व मी तूला दाखवतो कोण आहे. ते असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी एसटी बसच्या वाहक कल्पना उमाकांत बनसोडे (रा.अहमदपुर ता.अहमदपुर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.९२/२०२५ कलम १३२, १२१(१), ३५२, ३५१(२), भारतीय न्याय सहिंता नुसार वर्धमान दिलीप सोनकांबळे (रा.हाळी ता.उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत.
0 Comments