Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीरच्या विमानतळ संदर्भात एअरपोर्ट अॅथाॅरिटी आॅफ इंडियाकडुन सकारात्मक विचार

उदगीरच्या विमानतळ संदर्भात एअरपोर्ट अॅथाॅरिटी आॅफ इंडियाकडुन सकारात्मक विचार

माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या मागणीला लवकरच यश मिळणार

*उदगीर* :  मतदार संघ हा आंध्रप्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सिमेवर आहे. उदगीर नगरी ही ऐतिहासिक असून या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे तसेच जिल्हास्तरीय सर्व कार्यालये, जिल्हास्तरीय न्यायालये, प्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ.) कार्यालयासह वेगवेगळ्या प्रकारची जिल्हास्तरीय कार्यालये आहेत. तसेच रेल्वेची कनेक्टीव्हीटी असल्याने दळणवळणासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा उदगीर मतदार संघात उपलब्ध होत आहेत. तसेच नियोजित विमानतळासाठी मुबलक प्रमाणात जागाही उदगीर येथे उपलब्ध असून उदगीर येथे आपण विमानतळास मंजूरी द्यावी अशी मागणी उदगीरच्या विमानतळ संदर्भात एअरपोर्ट अॅथाॅरिटी आॅफ इंडियाकडे जानेवारी २०२५ मध्ये एका लेखी निवेदनाव्दारे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीचा एअरपोर्ट अॅथाॅरिटी आॅफ इंडिया यांनी 
सकारात्मक विचार करुन उदगीर येथे विमानतळ करण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरु करणार असल्याचे एअरपोर्ट अॅथाॅरिटी आॅफ इंडियाचे सदस्य अनिल गुप्ता यांनी कळवले आहे. यामुळे आ.संजय बनसोडे यांच्या मागणीला लवकरच यश मिळणार असुन सदर विमानतळ उदगीरला झाले तर आंध्रप्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यातील
व्यापा-यांना याचा फायदा होणार असुन या भागातील नागरिकांना देश - विदेश व धार्मिक स्थळांना जाण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात