Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली पाहणी

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली पाहणी

लातूर, दि. ०४ : अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पाहणी केली. तसेच या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सागर खर्डे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गोविंद भोसले, तालुका कृषि अधिकारी श्री. बावगे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अहमदपूर तालुक्यातील नांदुरा आणि लिंगदाळ येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची ना. पाटील यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. 
पावसाने शेतातील फळबाग व विद्युत सोलारचे नुकसान झाले आहे. तसेच विद्युत वाहिन्या व खांब मोठ्या प्रमाणात पडले होते. महावितरणने तात्काळ विद्युत खांब बसवून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी नांदुरा, गोताळा, लिंगदाळ येथील शेतकरी बांधव, पोलिस, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात