भाकसखेडा शिवारात धुऱ्यावर म्हैस चारण्यावरुन एकास काठीने मारहाण..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील भाकसखेडा शिवारात एकाला धुऱ्यावर म्हैस चारण्याच्या कारणावरून काठीने मारून दुखापत केली. याप्रकरणी सोमवारी १२ मे दुपारी दिडच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १२ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास भाकसखेडा शिवारातील फिर्यादीच्या शेतात आरोपीनी संगणमत करुन फर्यादी याने धु-याला म्हैस का चारता असे विचारले असता तुला काय करायचय आमच शेत आहे तुझ्या पण धु-याला म्हैस चारतो काय करतोस ते बघतो असे म्हणुन आरोपीनी लाथाबुक्याने मारहाण करुन शिवीगाळ करुन लक्ष्मण बिरादार याने त्याचे हातातील लाकडी काठीने फर्यादीचा मुलगा नामे ऋषीकेश याचे मांडीवर व पींडरीवर डाव्या हातावर काठीने मारून जखमी केले व तुम्हाला तर खतम करून टाकातो म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी तानाजी पंढरी जाधव रा. भाकसखेडा ता.उदगीर यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात लक्ष्मण व्यंकटराव बिरादार, मारोती/बाळु व्यंकटराव बिरादर दोघे रा.भाकसखेडा ता. उदगीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल नागरगोजे हे करीत आहेत.
0 Comments