उदगिरात बिल्डिंग मटेरिअल दुकानातून २ लाख ८५ हजार पळविले..
उदगीर शहरातील देगलूर रोडवरील सचिन ट्रेडर्स या बिल्डिंग मटेरिअल दुकानाचे शटरचे लाॅक तोडून गल्यामधील रोख रक्कम २ लाख ८५ हजार रुपये चोरून घेऊन गेले आहेत. याप्रकरणी शनिवारी १० मे दुपारी तीनच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ५ मे च्या मध्यरात्री शहरातील देगलूर रोडवरील सचिन ट्रेडर्स या बिल्डिंग मटेरिअल दुकानाचे शटरचे लाॅक तोडून दुकानातील गल्यामधील रोख रक्कम २ लाख ८५ हजार रुपये चोरून घेऊन गेले आहेत. याप्रकरणी गोरख विश्वनाथराव पाटील रा.कौळखेड ता.उदगीर यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बाहत्तरे हे करीत आहेत.
0 Comments