Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

सरस्वती माध्यमिक विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची स्मृतीशताब्दी जयंती उत्साहात संपन्न

सरस्वती माध्यमिक विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची स्मृतीशताब्दी जयंती उत्साहात संपन्न
उदगीर प्रतिनिधी
कुमठा बुद्रुक येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची स्मृतिशताब्दी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री वाघमारे एम.बी .हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक माने नंदकुमार राठोड एपी .राऊत एस के. पुठेवाड व्ही .जी . जवळे डी .आर. कांबळे यु .आर. मुंडे एस .बी. प्राध्यापक बिरादार एस. आर .हे उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांमधून गडमे निकिता ,गडमे अंकिता, माने शंकर, शेख महंमद, नामवाड समाधान ,तिगोटे वैभव ,कांबळे संगमेश्वर ,गडमे महेश , तिगोटे संविधान यांनी आपले मनोगत व्यक्त केले .प्रमुख पाहुण्यातून कांबळे यु .आर .यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन व कार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाहू महाराजांना शंभर सेकंदाची श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षीय समारोप वाघमारे एम.बी .यांनी केला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामवाड शंतनू आणि सूर्यवंशी गजानन याने केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षपूर्ती सांगते निमित्य शाळेतून निबंध स्पर्धा घेण्यात आली. यानिबंध स्पर्धेत माने ज्ञानेश्वरी, शेख अमरीन प्रथम आले तर बाबळसरे मयुरी सूर्यवंशी स्वप्नाली द्वितीय आले तर हांडगिरे ऋतुजा तृतीय आली. याप्रसंगी शासनाच्या आदेशानुसार इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा निकाल वाटप करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामवाड शंतनू, सूर्यवंशी गजानन यांनी केले तर आभार प्रदर्शन तेलंगे संग्राम यांनी केले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात