मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल
उदगीर शहरात अनंद नगर येथे मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार 25 जुलै रोजी घडला होता. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात कलम 354 (ड) भादवी 8,12 पोक्सो बाल लैंगिक अत्याचार अधिनियम प्रमाणे 25 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मुलींचा विनयभंग करणारा तरुण शिवलिंग गुणवंत पाटील यांना मुलीकडील लोकांनी बेदम मारहाण करून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले होते.सदरील तरुणावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीसाच्या संरक्षणात सामान्य उपजिल्हा रुग्णालयात तरुणावर उपचार सुरू होते.मुलांनी दिलेल्या तक्रारीवरून चौघांवर 29 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती असी की मुलीने मुलास भेटायला बोलविले असता मुलींच्या घरी गच्चीवर भेटायला गेलो असता.आरोपीने संगनमत करून मुलास लोखंडी रॉडने मारहाण करून डावा हात फॅक्चर केले व संपूर्ण शरीरावर मुक्का मार देऊन लाथाबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.असी फिर्याद शिवलिंग गुणवंत पाटील यांनी उपचार घेऊन उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून चौघां आरोपीविरुद्ध गुरंन 238/ 23 कलम 326,324,323,504,506,34 भादवी प्रमाणे 29 जुलै रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या आदेशाने अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव ह्या करीत आहेत.
0 Comments