Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

माणुसकी हा एकमेव धर्म समजुन सर्व घटकाचा सर्वांगीण विकास केला : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

माणुसकी हा एकमेव धर्म समजुन सर्व घटकाचा सर्वांगीण विकास केला : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

महादेव मंदिरास  ' ब ' पर्यटनाचा दर्जा मिळवून देणार

उदगीर : तालुक्यातील शंभु उंबरगा गावातील महादेवाचे मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान असुन या भागातील हजारो नागरीकांचे ते ग्रामदैवत आहे. मी आध्यत्माला मानणारा कार्यकर्ता असुन भक्ती हीच खरी शक्ती आहे. समाजात नैतिक, धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचे काम किर्तनातुन होत असते. यामुळे पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होत असतात. गेल्या साडेतीन वर्षात मतदार संघाचा झपाट्याने विकास केला. उदगीर - जळकोट तालुक्यासह ग्रामीण भागातील मूलभूत गरजा पूर्ण करुन शहराला जोडणारे सर्व रस्ते दर्जेदार केले. यामुळे आपण आज शहरात व ग्रामीण भागात वेगाने पोहचत आहोत. आज अधिकमासानिमित्त पंचक्रोशीतील भक्त या अखंड शिवनाम सप्ताहाला येवू शकले. आपण दिलेल्या मतामुळेच मला दोन वेळा मंत्री पदाची संधी मिळाली असुन मला जन्म जरी माझ्या आई वडिलांनी दिला असला तरी 
माझा राजकीय जन्म उदगीरकरांनीच दिला आहे.  या बाबीचा विचार करुन गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात माणुसकी हा एकमेव धर्म समजुन सर्व घटकाचा सर्वांगीण विकास केला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले.

ते उदगीर तालुक्यातील मौजे शंभु उबंरगा येथे आयोजीत अधिकमासा निमित्त सर्व धर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व २१०० सदभक्तांचा परमरहस्य पारायण सोहळ्यात बोलत होते.

याप्रसंगी उदगीरचे शंभूलिंग शिवाचार्य महाराज, हानेगावचे शंकरलिंग शिवाचार्य महाराज , बसवलिंग शिवाचार्य महाराज, निळकंठ शिवाचार्य महाराज, शिवराज नावंदे गुरुजी, भगवंतराव पाटील चामरगेकर, राजेश्वर स्वामी महाराज, दिलीप स्वामी महाराज, शिवलिंग पाटील किनीकर, रामदास पाटील सुमठाणकर, सभापती शिवाजी हुडे, प्रा.शिवाजी मुळे, कल्याण पाटील, श्याम डावळे, शिवानंद हैबतपुरे, ज्ञानेश्वर पाटील , माधवराव बर्गे, शंकरराव मोरगे, गौतम पिंपरे, विवेकानंद स्वामी, वीरभद्र महाराज, रामलिंग महाराज, शिवकांत स्वामी, कैलास जामकर, 
विठ्ठल चव्हाण , उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत , बांधकाम विभागाचे उपाभियंता एल.डी. देवकर,
वसंत पाटील, गजानन बिरादार, लिंगेश्वर स्वामी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, आपण मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यात म्हणून मी मतदार संघातील जनतेचे ऋण कामाच्या रुपात फेडण्याचा प्रयत्न करत आहे.
मागील काळात गट - तट विसरून काम केले आहे. आपल्या सर्व मूलभूत गरजा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. उदगीर शहरात
७ कोटीचे वीरशैव लिंगायत भवन उभारण्याचे काम चालु आहे तर जंगम समाजाच्या मागणीनुसार रेणुकाचार्य संस्कार भवनची आपण निर्मिती करत आहोत.
लोकशाहीमध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो. कुठलाही लोकप्रतिनिधी हा कामाचा असला पाहिजे.  मी निवडून आल्यानंतर रात्रीचा दिवस करुन मतदार संघाचा विकास केला. या भागात दळणवळण वाढवले. माय माऊंलीना घागरभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते  म्हणून मी जलजीवन मिशन व वाटरग्रीडची योजना आणली. मी काम करणारा कार्यकर्ता आहे बोलणारा नाही अशी ग्वाही ना.बनसोडेंनी उपस्थित नागरिकांना दिली. 
मी अध्यात्मला मानणारा कार्यकर्ता असल्याने शंभु उंबरगा गावातील नागरिकांच्या आग्रहाखातर आज मी इथे उपस्थित असुन आजपर्यंत या गावाला सहा कोटीच्या वर निधी उपलब्ध करुन देवुन या गावचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या मागील कार्यकाळात हत्तीबेट पर्यटन स्थळाला व डोंगरशेळकी मंदिराला 'ब' दर्जा मिळवुन दिला असल्याचे सांगून येथील महादेव मंदिरास ' ब ' दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचाही शब्द ना.बनसोडे यांनी दिली.
यावेळी जिल्हाभरातुन आलेले भाविक भक्त, कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, शंभु उंबरगा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात