आर्यन मॅन संदीप गुरमे यांचा हस्ते ध्वजारोहण,नागलगाव ग्रामपंचायतीने केला सत्कार
उदगीर:तालुक्यातील नागलगावचे सुपुत्र व संभाजी नगर वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी आर्यन मॅनचा दोन वेळेस किताब पटकावून इतिहास रचला व भारताचे नाव लौकिक केलं आर्यन मॅनचा किताब पटकविणारे भारतातील ते पहिलेच पोलीस अधिकारी आहेत आर्यन मॅन संदीप गुरमे यांनी 14 ऑगस्ट रोजी नागलगाव येथे आले असता संदीप गुरमे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व आर्यन मॅन संदीप गुरमे यांचा ग्रामपंचायतिच्या वतीने शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला, यावेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच सुभाष राठोड, उपसरपंच नेताजी कांबळे,ग्रामविकास अधिकारी रोडेवाड,ग्रामपंचायत सदस्य बस्वराज गुडसुरे,यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य लिपिक रमेश बिरादार, ग्रामपंचायतिचे सर्व सेवक व गावातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments