तहसील कार्यालय यांच्या वतीने पांडुरंग मूकबधिर विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम" एक हात मदतीचा
काहीतरी एक नाविन्य उपक्रमाचे औचित्य साधून 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा महसूल व वन विभाग अभियाना अंतर्गत एखाद्या समारंभात पाहुण्यांचा मान सन्मान करतात त्याचं प्रमाने या मुकबधीर बालकांचा सन्मान करीत उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी मुकबधीर मुलांसोबत उपस्थित राहुन मिष्ठान्नाचे जेवण व फळे वाटप व शैक्षणिक साहित्य वाटप केले. तसेच एक दिवस तरी या मूकबधीर विद्यार्थ्यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले.मी तर खरंच यांच्यामध्ये येऊन खूप आनंदी झालो.असे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले
तहसीलदार रामेश्वरजी गोरे यांनी बोलताना म्हंटले की आम्ही काय एक दिवस घास भरू शकतो पण आपण कायमचं या विद्यार्थ्यांना रोजचं जेवण, शिक्षण व्यवस्था,आरोग्याची काळजी , शिकवणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थेचा पण खूप मोठा कार्याचा वाटा आहे असे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी शाळेतील कर्मचाऱ्यांचा कौतुक केला
यावेळी मंडळ अधिकारी गणेश हिवरे, संतोष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील मानकीकर,राम जाधव,तलाठी अमोल रामशेटे,आकाश आलूरे,
आलट सर, पराड सर,म्हेत्रे सर, पाटील सर,पिंपळे सर,पवार सर,राठोड सर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर व मान्यवर उपस्थित होते.
0 Comments