Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

महसूल सप्ताह अंतर्गत तहसील कार्यालयात जनसंवाद "नाते विश्वासाचे" उपक्रम

महसूल सप्ताह अंतर्गत तहसील कार्यालयात जनसंवाद "नाते विश्वासाचे" उपक्रम


उदगीर: तहसील कार्यालय येथे महसूल सप्ताह अभियाना अंतर्गत जनसंवाद नाते विश्वासाचे उपक्रम राबविण्यात आले.या कार्यक्रमा अंतर्गत श्री सुशांत
शिंदे मा. उपविभागीय अधिकारी उदगीर, श्री रामेश्वर गोरे मा. तहसीलदार उदगीर व श्रीमती सुरेखा
स्वामी तहसीलदार जळकोट यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाअंतर्गत श्री सुशांत शिंदे
उपविभागीय अधिकारी उदगीर यांनी, उदगीर व जळकोट तालुक्यातील शेतक-यांशी जनसंवाद
साधून शेतरस्ते, नैसर्गिक आपत्ती, सलोखा योजना, ई पीक पाहणी ईत्यादी विविध विषयावर सखोल
चर्चा करुन मार्गदर्शन केले. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे,
असे सांगीतले. शेतक-यांना याबाबत पूर्णपणे माहीती मिळण्यासाठी कार्यालयात शासनाच्या विविध
योजनेविषयी स्टॉल उभा करुन त्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच उदगीर व जळकोट
तालुक्यातील शेतक-यांना कलम 143 नूसार शेतरस्ता खुला करण्यात आलेले आदेश, ७/१२,
रहिवाशी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शेतक-
यांनी आपले मनोगत व्यक्त करुन, कार्यक्रमात उत्कृष्टपणे सहभाग घेतला. कार्यक्रमात नायब
तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, अव्वल कारकून, महसूल सहायक, शिपाई कोतवाल, पोलीस
पाटील व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री धाराशीवकर संतोष नायब तहसीलदार
यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री रामेश्वर गोरे तहसीलदार उदगीर यांनी करुन, संवादात्मक
व संवेदनात्मक प्रशासनाबात महत्व विषद केले. शेवटी श्रीमती सुरेखा स्वामी तहसीलदार जळकोट
यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली

Post a Comment

0 Comments

जाहिरात