रघुकुल मंगल कार्यालयाजवळ अज्ञात चोरट्याने महिलेचे गंठण हिसकावून पळविले
उदगीर:शहरातील रघुकुल मंगल कार्यालयाजवळ अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावून पाळविल्याची घटना 3 ऑगस्ट रोजी घडली.पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती असी की,फिर्यादी महिला ब्राह्मशक्ती बालाजी चौधरी यांनी रघुकुल मंगल कार्यालयाकडून मुख्य रस्त्याकडे जात असताना दोघा अज्ञात चोरट्यानी संगनमत करून महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे मिनी गंठण ज्याची किंमत 75 हजार रुपयांचे सोने मोटारसायकल वर समोरून राँग साईडने येऊन मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या अज्ञात चोरट्याने गळ्यातील मिनी गंठण हिसका मारून घेऊन पळून गेले.असी फिर्याद ब्राम्हशक्ती बालाजी चौधरी यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात चोरट्या विरोधात गुरंन 242/23 कलम 392,34 भादवी प्रमाणे 3 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तपशाळे हे करीत आहेत.
0 Comments