उदगीर शासकीय सामान्य रुग्णालयातील डॉ वंगे हे प्रसूती विभागाचे देवदूत
उदगीर जिल्हा निर्माण करावा अशी मागणी सध्या उदगीर तालुक्यात जोर धरू लागली आहे.उदगीर तालुका हा महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा तालुका म्हणून ओळखला जातो. लातूर जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका म्हणून उदगीरची ओळख आहे.कर्नाटक,आंध्रप्रदेश,तेलंगणा, राज्याच्या सीमेवर वसलेला उदगीर शहर,लातूर जिल्ह्यातील दुसरी मोठी बाजारपेठ म्हणून उदगीरची ओळख, उदगीर शहरात अनेक छोटे मोठे उद्योग करणाऱ्याची संख्या जास्त प्रमाणात आहे.उदगीर शहरात मध्ये भागी असलेले शासकीय रुग्णालय या रुग्णालयात अनेक गरोदर महिला प्रसूतीसाठी सामान्य रुग्णालयात येतात,सामान्य रुग्णालयात दररोज 10 ते 15 महिलांची प्रसूती करण्याचे काम एकमेव डॉ वंगे यांच्याकडून केले जाते.डॉ वंगे यांच्यापुढे अनेक आवाहने येतात आलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन आपले कर्तव्य पार पाडीत असतात,उदगीर सामान्य रुग्णालयात प्रसूती विभागात एकटे डॉ वंगे यांनी आपली सेवा बजावताना रुग्णालयात आलेल्या प्रसूती महिलांना व त्यांच्या नातेवाईकांना सांमजनस्यपणाची वागणूक देतात म्हणून डॉ वंगे यांना प्रसूती विभागाचे देवदूत मानले जात आहे. सामान्य रुग्णालयातील कोणताही कर्मचारी असो डॉ वंगे यांचा सारखा डॉक्टर अधिकारी सामान्य रुग्णालयाला मिळणे हे प्रसूती विभागाचे भाग्यच असे बोलले जात आहे.प्रसूती विभागाची एवढी मोठी जबाबदारी सांभाळणारे एकमेव डॉक्टर वंगेच आहेत. गरोदर महिलांची वेळोवेळी तपासणी करून,योग्य सल्ला देणारे डॉ वंगे यांनी उदगीर तालुक्यात आपली ओळख निर्माण करून घेतली,डॉ वंगे यांनी त्यांच्या कार्यकाळात आजपर्यंत केलेली सेवा महिलेवर केलेली प्रसूती शस्त्रक्रिया यामुळे डॉ वंगे यांना प्रसूती विभागाचे देवदूत मानले जात आहे.
0 Comments