उदगीरातील प्रवेशव्दार हे महाराष्ट्रातील एकमेव महा प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाईल : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
उदगीर : शहर हे एक ऐतिहासिक शहर असुन या शहराला व तालुक्याला ऐतिहासिक वारसा आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या शहरात प्रवेश करताना आपल्या शहराच्या इतिहासाची साक्ष देईल अशी भव्य कमान उभारावे अशी ईच्छा होती आणि आपल्या सकल मराठा समाजानेही माझ्याकडे मागणी केली होती त्यांच्या सुचना व मागणीचा आदर करून आपण आपल्या या ऐतिहासिक शहरात प्रवेश करताना आपल्या शहराचे एक वेगळे वैशिष्टय नागरिकांना प्रेरणा देईल म्हणून
रयतेचे राजे, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते छत्रपती शिवाजी महाराज महाप्रवेशव्दार उभारत आहोत. आपल्या उदगीर शहरातील प्रवेशव्दार हे महाराष्ट्रातील एकमेव महा प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
ते छत्रपती शिवाजी महाराज महाप्रवेशव्दार बांधकामाच्या भुमीपुजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भगवान पाटील तळेगावकर, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, लातूरचे मोईज शेख, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रा.प्रवीण भोळे, रिपाईचे देविदास कांबळे, बाजार समितीचे संचालक प्रा.श्याम डावळे, माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, फैजुखाँ पठाण, अॅड.दत्ता पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, पंडित सुर्यवंशी, धनाजी मुळे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, अॅड.सावन पस्तापुरे, शहराध्यक्ष समीर शेख, सर्जेराव भांगे, रामेश्वर बिरादार, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, गटविकास अधिकारी सुरडकर, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, मलकापुरचे सरपंच गुरुनाथ बिरादार, मादलापुरचे सरपंच उदयसिंह मुंडकर, सरपंच बालाजी देमगुंडे, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, राजकुमार भालेराव, रामेश्वर पवार, छावाचे दत्ता पाटील, फय्याज शेख, सय्यद जानी, राजकुमार मुक्कावार, साईनाथ चिमेगावे, अरूणा चिमेगावे, बबिता भोसले, रा.काँ. च्या महिला तालुकाध्यक्षा उर्मिला वाघमारे, मुकेश भालेराव, सुनिल केंद्रे, शफी हाशमी, विलास शिंदे, उदयसिंह ठाकुर, पप्पु गायकवाड, पिंटु डावळे, बळीराम केंद्रे, नवनाथ गायकवाड, पंडित सुकणे, अनिल इंगोले, प्रा.मटके, डाॅ.कोठारे, ज्योती वलांडे, हुसना बानु, खादीवाले, आदी उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महाप्रवेशव्दार बांधकामाचे भुमीपुजन ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन करण्यात आले.
पुढे बोलताना ना.बनसोडे यांनी, सर्व जाती धर्माला एकत्र करण्याच काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केल आहे. आपल्या सर्वांच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आपण भव्य दिव्य महाप्रवेशव्दार उभारत आहोत या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण सर्वजन साक्षीदार आहात ही मोठी भाग्याची गोष्ट असुन उदगीर मतदार संघात माझी एकच भुमिका आहे ती म्हणजे फक्त विकासाची म्हणून तर संबंध
मराठवाड्यात केवळ आपल्या उदगीर मतदार संघाचीच चर्चा आहे. शहरातील जळकोट रोडवर मौलाना आझाद महाप्रवेशव्दार उभारणार असुन त्याचेही लवकरच भुमीपुजन करणार आहोत. माझ्या राजकीय जीवनात व मंत्री पदाच्या काळात आपण केवळ जनतेच्या हितासाठी काम करत आहोत. शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती करण्यासाठी जळकोट परिसरात तिरु नदीवर बॅरेजस उभारले असुन त्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच लोकार्पण सोहळा करणार असल्याची ग्वाही ना.बनसोडे यांनी दिली. मतदार संघाचा सर्वांगीण विकास करताना आपण सर्व जाती - धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील अनेक इमारतीचे काम पुर्णात्वाकडे जात आहे भविष्यात मराठा भवनाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगुन सर्व जाती धर्माचे नागरीक एकत्र येवून हातात हाथ घेवुन उदगीरचा विकास करावा व उदगीरला जिल्हा करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुन मी लवकरच जिल्ह्याचा आराखडा तयार करणार असल्याचे सांगितले. उदगीर तालुक्यातील तोंडचिर येथील रामघाटावर प्रवेशव्दार उभारणार आहे. आपल्याकडे एक धारणा आहे की गावची वेस जितकी भव्य तितक ते गाव समृध्द असते अशी एक आपल्याकडे समज होती म्हणून आपण शहरात येणा-या मुख्य रस्त्यावरील सर्व प्रवेशव्दाराचे सुशोभिकरण करणार आहोत आपल्या शहराला तुमच्या साथीने आपल्या मतदार संघाला विकासाची दिशा देण्याचे काम करु, फक्त तुमची सगळ्यांची साथ असली पाहिजे भविष्यात एकदिलाने उदगीर मतदार संघाचा विकास करुन उदगीरला जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करु असे उपस्थितांना आश्वस्तही ना.संजय बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.मदन पाटील यांनी केले. यावेळी शहर व ग्रामीण भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments