जिल्हाधिकारी उदगीर दौऱ्यावर असताना वनपाल अधिकारी परशुराम पवार यांचा अजब कार्यभार
*उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निलंबनाची मागणी करणार*
कार्यालयीन कामकाज सोडून हाकतोय ऑटोरिक्षा
उदगीर:येथील सामाजिक वनीकरण कार्यालयातील वनपाल अधिकारी परशुराम पवार यांनी एक अजब कार्यभार करीत असल्याची माहिती उघडकीस आली आहे.लातूर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी घुगे मॅडम हे उदगीर दौऱ्यावर आले असता वनपाल अधिकारी परशुराम पवार यांनी कार्यालयीन वेळेत रस्त्यावर ऑटोचे भाडे मारताना आढळून आले आहे.शासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करीत असताना अशा अधिकाऱ्यांनी चक्क कार्यालयीन कामकाज सोडून रस्त्यावर वर ऑटो चालवून भाडे मारत असल्याची बाब समोर आली आहे. शासनाचे भरमसाठ वेतन घेऊन कार्यालयीन वेळेत वनपाल अधिकारी ऑटो रिक्षा चालवत असेल तर हा एक अजब कारभार समोर आला आहे. वनपाल अधिकारी परशुराम पवार यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच लक्ष नाही का?किंवा वरिष्ठ अधिकारी परशुराम पवार यांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळी ऑटोभाडे मारण्याची परवानगी दिली आहे की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. वनपाल अधिकारी परशुराम पवार यांना सेवेतून निलंबित करावी अशी मागणी पत्रकारांच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येणार आहे.
0 Comments