Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीरच्या जीएसपीएम कॅम्पसमध्ये उद्या गुरुवर्य पुरस्कार सोहळा ; स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान !

उदगीरच्या जीएसपीएम कॅम्पसमध्ये उद्या गुरुवर्य पुरस्कार सोहळा ; स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान !

[] मंत्री संजय राठोड व मंत्री संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती []

उदगीर  : येथील गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा दरवर्षी गुरुवर्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करून शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाचा गुरुवर्य पुरस्कार सोहळा गुणाई शिक्षण संस्थेच्या जीएसपीएम कॅम्पसमध्ये सोमवारी ( दि. २ ) सकाळी ११ वाजता संपन्न होणार असून राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
       उदगीर येथील गुणाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सन 2019 या वर्षापासून शैक्षणिक , सामजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना व प्राध्यापकांना  गुरुवर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. प्रति वर्षाप्रमाणे यंदाही जिल्हास्तरीय गुरुवर्य पुरस्कार सोहळा आणि मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान सोहळा हा संयुक्त कार्यक्रम सोमवारी ( दि. २ ) सकाळी ११ वाजता संस्थेच्या जळकोट रोड येथील जीएसपीएम कॅम्पस मधील बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजित करण्यात आला आहे. 
    स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान व गुरुवर्य पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण , बंदरे मंत्री संजय बनसोडे हे राहणार आहेत. तर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या शुभ हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे , काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश्वर निटुरे , लातूर जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे , उदगीर बाजार समितीचे संचालक भगवान पाटील तळेगावकर , गुणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बापूराव राठोड , सचिव अमित राठोड हे उपस्थित राहणार आहेत. या गुरुवर्य पुरस्कार वितरण व स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान सोहळ्यास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बापूराव राठोड , सचिव अमित राठोड आणि पुरस्कार सोहळा समितीच्या सचिव अनिता हैबतपुरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात