सत्यासाठी स्वत:चा प्राण पणाला लावणारे जगातील एकमेव नेतृत्व म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
उदगीर : राष्ट्रपिता महात्मा गांधी आपल्या देशाचे बलस्थान आहेत जगात असा एखादाच देश असेल ज्या देशात गांधीजींचे नावाने एखादी संस्था, एखादी वास्तु एखादे ठिकाण नसेल किंवा पुतळा नसेल त्यांच्या कार्यापुढे आपण सर्वजण नतमस्तक होतो. महात्मा गांधीजींनी सत्याचे प्रयोग केले जीवनात नैतिकता पाळली म्हणून त्यांना आपण आधुनिक भारताचे राष्ट्रपिता म्हणून संबोधतो.
सत्याचा आग्रह धरणारे सत्यासाठी स्वत:चा प्राण पणाला लावणारे जगातील एकमेव नेतृत्व म्हणजे महात्मा गांधी आहेत असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर येथे आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ' उमगलेले गांधी ' या अभिवाचन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
यावेळी शहरातील महात्मा गांधी उद्यानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ना.संजय बनसोडे यांनी अभिवादन केले.
याप्रसंगी दीपक राज्याध्यक्ष, चिन्मयी सुमित, विक्रांत कोळपे, धनश्री करमरकर, माजी आमदार मनोहर पटवारी , राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी नगराध्यक्ष सौ. उषा कांबळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, उदगीर काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळकोट तालुका अध्यक्ष अर्जुन आगलावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रा. प्रवीण भोळे , शहराध्यक्ष समीर शेख, मंजुरखाँ पठाण, बाजार समितीचे संचालक प्रा. श्याम डावळे, मधुकर एकुर्केकर, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत, तहसीलदार रामेश्वर गोरे, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, फैय्याज शेख, नवनाथ गायकवाड, सय्यद जानी, इब्राहिम नाना, शमशोद्दीन जरगर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.बनसोडे यांनी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दीपक राज्याध्यक्ष यांची संकल्पना व अरुण काकडे यांची निर्मिती असलेल्या अविष्कार निर्मित उमगलेले गांधी या अभिवाचनाच्या कार्यक्रमाचे पाच हजारापेक्षा जास्त प्रयोग आजपर्यंत झाले असून कुठलीही देणगी न घेता हा कार्यक्रम करतात ती मोठी अभिमानाची गोष्ट असून महात्मा गांधी यांचा जीवनपट पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी निरंतर करत असल्याने त्यांच्या टीमचे कौतुक केले.
आपला स्वातंत्र्य लढ्याचा प्रसार महात्मा गांधीजींनी सर्वदूर घेवुन गेला आणि सर्वांना एका सूत्रात बांधण्याचे काम राष्ट्रपिता म.गांधीजींनी केले. त्या काळात शिक्षणाचा प्रसार नव्हता तरीही करोडो भारतीयांना त्यांनी एकत्र केले त्यांचा आदर्श सध्याच्या पिढीने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे म्हणून आपण महात्मा गांधीजींचा पुर्णाकृती पुतळा आपल्या म.गांधी गार्डन मध्ये पुढच्या वर्षी आपण उभारणार असुन त्यासाठी ४० लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला आहे. यामुळे पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल.
आपल्या देशाच्या प्रगतीने आज आपला देश जागतिक महासत्ता म्हणून पुढे जातो आहे याचे श्रेय महात्मा गांधीजींच्या धोरणाला जाते सामाजिक समतेचा धर्मनिरपेक्ष धोरणाचा पाया महात्मा गांधीजींनी घातला असल्याचेही ना.संजय बनसोडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगा राचुरे यांनी केले.
सुत्रसंचलन धनंजय गुडसुरकर यांनी केले. या कार्यक्रमास शहरातील आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments