देशाच्या जडणघडणीत शिक्षकांचे कार्य गौरवास्पद : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
उदगीर : आपल्याला उच्च पदापर्यंत घेवुन जाण्याचे कार्य हे गुरुजण वर्ग करत असतात त्याततच आपला समाज आणि राष्ट्र घडवण्याचे कार्य ही गुरुजन वर्गाच्या हातून होत असते म्हणून आपल्या या गुरुंचा सत्कार
'गुरुवर्य पुरस्कार ' देऊन करण्याचे काम जी. एस. पी. एम ही संस्था दरवर्षी करत असते. भावी पिढी सक्षम असली पाहिजे यासाठी शिक्षक कायम प्रयत्नात असतात. तरुणांच्या बळावर हा देश पुढे जात असुन समाज प्रबोधनाचे काम ही शिक्षकाकडुन होत असते. आपल्या देशाच्या जडणघडणीत शिक्षकांचे कार्य गौरवास्पद असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथील गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ आयोजीत गुरूवर्य पुरस्कार - २०२३ व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा बॅकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर, संस्थेचे अध्यक्ष बापूराव राठोड, शिवसेनेचे मनोज चिखले, माजी सभापती सौ. ज्योती राठोड, संस्थेचे सचिव अमित राठोड, भाजपाचे प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे, तहसीलदार रामेश्वर गोरे, माजी नगरसेवक गणेश गायकवाड, सय्यद जानी, पंडित सुर्यवंशी, बालाजी गवारे, अमोल निडवदे, रणजित पाटील, सतिश पाटील माणकीकर,शिवशंकर पांडे, संस्थेचे सहसचिव विजय राठोड, कोषाध्यक्ष दिगंबर राठोड, सदस्य रोहित राठोड, उदयसिंह ठाकुर, स्वातंत्र्य सेनानी साकोळकर दादा, पंढरीनाथ तिरुके, ददापुरे सुभाष आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी,
महापुरुषांच्या विचाराचा वारसा हे आपले गुरुजन वर्ग पुढे नेत आहेत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. या संस्थेच्या माध्यमातुन बहुजन विद्यार्थांना शिक्षण देण्याचे कार्य होत असल्याचे पाहुन या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून कायम या संस्थेच्या पाठीशी उभा राहण्याचे काम करणार आहे
उदगीर हे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते. आपल्या उदगीरच्या शिक्षणाचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जावा अशी अपेक्षा व्यक्त करुन मागील काळात मतदार संघाच्या विकासाचा बॅकलाॅग भरुन काढला.
सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी मी सदैव कटिबध्द असुन राज्यात जेंव्हा छोटे - छोटे जिल्हे निर्माण होतील तेंव्हा उदगीरचे नाव नंबर एक वर येईल अशी ग्वाही ना.बनसोडे यांनी देवुन उदगीर शहराच्या भुमीगत गटाराठी( अंडर ग्राऊंड ड्रेनेज ) साठी ३५० कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. तोंडचिर येथील रामघाट येथे प्रवेशव्दार उभारणीसाठी १ कोटी रु, उदागिर बाबांच्या समाधी स्थळाच्या सुशोभिकरणासाठी १ कोटी रु, देवर्जन येथील हत्तीबेट पर्यटन स्थळासाठी ५ कोटी, नाट्यगृह १२ कोटी रुपयाचा निधी परवाच आपण मंजुर करुन घेतला असुन उदगीरचा भौतिक विकास केला असल्याचे ना.संजय बनसोडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वर्षा बिरादार व स्वाती भांगे यांनी केले तर आभार अनिता हैबतपुरे यांनी मानले.
या कार्यक्रमास उदगीर परिसरातील नागरिक, आजूबाजूच्या गावातील सरपंच, चेअरमन, पुरस्कार प्राप्त शिक्षक , संस्थेचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments