शेल्हाळ पाटी येथे सकल मराठा समाजाचा आरक्षणासाठी रास्ता रोको
उदगीर:मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषणास बसलेले संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध आंदोलने करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून शेल्लाळ पाटी उदगीर येथे राज्यमहामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी तीन तास राज्य महामार्गावरील वाहतूक आडविण्यात आली महाराष्ट्र राज्य शासनाच्या निषेदाच्या घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात मधुकरराव एकुर्केकर,रामराव बिरादार येनकिकर,शिवाजी पाटील तोंडचिरकर, रामेश्वर बिरादार, दत्ता पाटील,प्रकाश राठोड, बाळासाहेब पाटोदे, सतीश पाटील मानकीकर, अजिंक्य पाटील, संदीप पाटील, अजित फुलारी,सूर्यभान चिखले, शंकर मोरे, अभी लांडगे, राम मोरे, नेताजी नराचे, नरसिंग मोरे, विठ्ठल गोजेगावे, विवेकानंद मोरे, विवेकानंद मोरे,हेमंत मोरे, दत्ता मोरे,विठ्ठल मोरे, नामदेव बिरादार, मारुती बिरादार, प्रदीप जाधव तोंडचिर, राम जाधव तोंडचिर, प्रमोद काळोजी, हनुमंत लोभाजी, नागेश मेहेकरे, बालाजी चिखले, किशनराव मोरे, गणेश कल्याणी, हंसराज हुलसुरे, गोविंदराव इंगळे, महेश मोरे सचिन बिरादार, किशोर मोरे, सुरेश लांडगे, श्याम मोरे,विमलबाई चिखले सरपंच शेल्हाळ, कालींदाबाई मोरे, लक्ष्मीबाई लांडगे, गयाबाई मोरे, जनाबाई चिखले, हौसाबाई मोरे,इत्यादी आंदोलनकर्ते उपस्थित होते.
0 Comments