ना. उदय सामंत, ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते ‘माझी माती, माझा देश’ अभियान अमृत कलशांचे पूजन
लातूर, दि. 13 : ‘मेरी माटी, मेरा देश-माझी माती, माझा देश’ अभियान अंतर्गत जिल्ह्यातील माती दिल्ली येथे अमृत वाटिका निर्मितीसाठी जाणार आहे. जिल्ह्यातील 10 पंचायत समितीमधून आलेल्या कलशांचे पूजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्योगमंत्री उदय सामंत, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, माजी आमदार गोविंद केंद्रे यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातून प्रत्येक पंचायत समितीमधून एक असे 10, जिल्ह्यातील 9 नगरपालिका व नगरपरिषदेतून एक आणि महानगरपालिकेचा एक अमृत कलश असे एकूण 12 अमृत कलश मुंबई येथे रवाना होतील. दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या अमृत वाटिकेसाठी या कलशातील माती वापरली जाणार आहे.
*****
0 Comments