उदागीर बाबाच्या किल्ल्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम
उदगीर:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तसेच माननीय मंगल प्रभात लोढा साहेब , मंत्री कौशल्य विकास यांच्या मार्गदर्शनाखाली 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्ताने गड किल्ल्यांची स्वच्छता अभियान अंतर्गत उदगीर येथील उदागीर बाबा किल्ल्याची स्वच्छता मोहीम अंतर्गत उद्घाटक म्हणून माननीय श्री गोविंद केंद्रे माजी आमदार यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की महाराष्ट्रातील गड किल्ल्याचे जतन व स्वच्छता करण्याची जबाबदारी नवीन पिढीवर व युवकांवर अवलंबून आहे तसेच युवकांनी अभ्यासाबरोबरच आपल्या सभोवताली असलेल्या गडकिल्ल्यांचे व सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर शहराचे पोलीस उपअधीक्षक श्री दिलीप भागवत, गटविकास अधिकारी पंचायत समिती उदगीर श्री प्रवीण सरवडकर, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अनिल पाटील हे उपस्थित होते सर्व मान्यवरांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले . याप्रसंगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था संस्थेचे प्राचार्य श्री एस एस जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती वाघमोडे व्हि डी ,श्री भिंगोले एम एम, श्री शिंदे एम एन , श्री डोंगरे ए एस, श्री तोडे डी पी , श्रीमती परसे एम बी , श्री बिरादार टीव्ही ,श्री सुखणीकर पि टी, श्री हंबीरे एस बी, श्री बिरादार जी एन, श्री बोईनवाड के ए, श्री गायकवाड एल पी ,श्री वडले एन जी, श्रीमती बनसोडे डी जे श्री सुरवसे यांची व श्रीमती झिंगे बाई अशा सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कुमारी दीक्षा वाडकर व कुमार धोंडू तात्या पांचाळ यांच्या समवेत संस्थेमधील 250 प्रशिक्षणार्थ्यांनी संपूर्ण किल्ल्याची साफसफाई केली त्यानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुकनिकर पि टी यांनी केले व आभार प्रदर्शन श्री तोटे डी पी यांनी केले
0 Comments