मारोती तांडा येथेच रास्त भाव धान्य वाटप करण्याची शिधा पत्रिका धारकांची मागणी
उदगीर:तालुक्यातील नागलगाव येथील मारोती तांडा येथे शासन मान्य रास्त भाव दुकान असून दुकान दाराने मारोती तांडा येथे शिधापत्रिका धारकांना राशनचे धान्य वाटप न करता गेली 10 ते 15 वर्षा पासून बोरतळा तांडा येथे राशन धारकांना धान्य वाटप केले जात आहे.महसूल असलेल्या मारोती तांडा येथील शासन मान्य रास्त भाव दुकानदराने शासनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करीत असून शिधापत्रिका धारकांशी खेळ सुरू केला आहे.मारोती तांडा येथे असलेल्या रास्त भाव दुकानाचे धान्य बोरतळा तांडा येथे कसे काय वाटप असा प्रश्न शिधापत्रिका धारकांना पडलाय.रास्त भाव दुकानदाराने गेली 10 ते 15 वर्षा पासून बोरतळा तांडा येथे वाटप करण्यात येत असलेले राशनचे धान्य खेळ थांबवून मूळ गावं मारोती तांडा येथेच वाटप करण्याची मागणी मारोती तांडा येथील नागरिकांतून होत आहे.
0 Comments