रेल्वे पोल जवळ अनोळखी वृद्ध व्यक्तीला मृतदेह आढळला..
उदगीर - चाकूर रेल्वे मार्गावरील पोल क्र. पी.एफ.नं.१ वर ६० वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी परळी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरील मयताचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी कामी शासकीय रुग्णालय चाकूर येथे दाखल करण्यात आले. मृताची अद्यापही ओळख पटलेली नसून त्याचा शोध घेणे कामी पोलीस प्रयत्न करीत आहे. जर कोणास सदरील व्यक्ती रंगाने काळासावळा व अंगाने सडपातळ असून त्याची ऊंची ५ फुट, ५ इंच आहे. मळकट पांढरा शर्ट व काळा पँट अंगात आहे. वरील वर्णनाचा व्यक्ती कोणाचा बेपत्ता असले तर उदगीर रेल्वे पोलिसांना संपर्क साधावा असे उदगीर रेल्वे पोलीसांच्या वतीने सांगण्यात आले.पुढील तपास विजय राऊत हे करीत आहेत.
0 Comments