उदगीर येथून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात विरुद्ध गुन्हा...
घरातून बाहेर जाऊ येतो म्हणून गेला, मात्र परतलाच नाही..
उदगीर शहरातील फुलेनगर येथील इयत्ता अकरावीत शिकणारा १६ वर्षीय मुलगा घरातून बाहेर जाऊन येतो म्हणून गेला मात्र अद्यापही परत आला नाही. याप्रकरणी बुधवारी (८ नोव्हेंबर) रात्री उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
प्रणय लक्ष्मण कांबळे (वय १६) हा दि.४ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फुलेनगर भागातील घरातून तो बाहेर जाऊन येतो म्हणून तो बाहेर गेला मात्र अद्यापही परतलाच नाही. व तसेच त्याचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून घेवून गेले. अशी फिर्याद मुलाचे वडील लक्ष्मण सूर्यकांत कांबळे रा.फुलेनगर उदगीर यांनी दिल्यावरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१२/२०२३ कलम ३६३ भादवि नुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करीत आहेत.
0 Comments