Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

खंजर घेऊन दहशत माजविणारा आरोपी लोहा पोलिसांनी केला जेरबंद.

खंजर घेऊन दहशत माजविणारा आरोपी लोहा पोलिसांनी केला जेरबंद.

कारवाही दरम्यान दोन पोलिस झाले जखमी.
शस्त्र अधिनियम कलम 4 (25) प्रमाणे तीन आरोपीवर लोहा पोलिसात गुन्हे दाखल.

 लोहा:कंधार रोडवर तहसील समोर तीन आरोपी मोठा खंजर घेऊन रोडवर फिरून गाड्या अडून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमध्ये दहशत पसरवीत होते.
 ही माहिती लोहा पोलिसांना मिळतात तात्काळ लोहा पोलिस चे पोलीस नाईक माधव डफडे, पोलिस अंमलदार नामदेव ईजुलकंठे, वामन राठोड हे घटनास्थळी पोहोचले. तेव्हा आरोपी शिवम हा एका फुटापेक्षा मोठा धारदार चाकू हातामध्ये घेऊन फिरवत होता.पोलिसांनी हातात चाकू घेऊन फिरणाऱ्या व दहशत मजवीणाऱ्या आरोपीस अतिशय सीताफिने पाठलाग करून पकडले व अटक केली.आरोपी च्या हातातील खंजर पोलिसांनी काढून घेऊन जप्त केला.
 इतर दोन आरोपी वीरेंद्र राजेंद्र नरंगले व सुमित वाघमारे हे घटनास्थळावरून पळून गेले पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
 सदरच्या कारवाईमध्ये आरोपीचा पाठलाग करताना आणि आरोपींना पकडताना पोलिस अंमलदार ईजुलकुंटे यांच्या पायाला मार लागला असून पोलीस नाईक डफडे यांच्या हाताला मार लागून कारवाही दरम्यान पोलीस जखमी झाले होते.
सदर प्रकरणी लोहा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी पोलीस नाईक डफडे त्यांच्या तक्रारीवरून गुरंन 278/ 2023 कलम 4/25 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 पुढील तपास सहाय्यक फौजदार  बगाडे करीत आहेत.
 पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनावरून पोलीस अंमलदार डफडे ईजुलकुंठे राठोड यांनी ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments

जाहिरात