दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात दरोडेखोरांच्या ग्रामीण पोलिसांनी आवळल्या मुसक्या
उदगीर:येथील शासकीय विश्राम गृहाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दरोडा टाकण्याच्या तयारीत चार चाकी कारसह सराईत गुन्हेगार दबा धरून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चोहोबाजूंनी वेढा देऊन अतिशय शिताफीने दरोडेखोरांना ताब्यात घेतले.सराईत गुन्हेगाराकडून धारदार शस्त्रे व मिरचीच्या पुड्या जप्त केल्याची घटना 9 डिसेंबर रोजी मध्य रात्री घडली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर लातूर रोड शासकीय विश्राम गृहाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना उदगीर ग्रामीण पोलिसांनी दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे, दरोडेखोरांची झाडाझडती घेतली असता दरोडेखोरांनी कंबरेत धारदार सुरा,धारदार चाकू,लॉक तोडण्याचे लोखंडी साहित्य,अंबारी मिरची पूड,वेळूच्या काठ्या, लोखंडी कटावणी,एम.एच.२४ एयु ४५६४ क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार, विविध प्रकारच्या कंपनीचे मोबाईल असा एकूण ३ लाख ९८ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी जप्त करून दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहेत.सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय रामराव भोसले यांनी दिलेल्या फिर्यादी वरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी आकाश भगवान काळे, ज्ञानोबा पिराजी समुखराव, राहुल चंद्रकांत वाघमारे,हरी बाळू जाधव,रणजित दयानंद कांबळे,अनिल बब्रुवान कांबळे,शुभम हणमंत कराड सर्व राहणार लातूर यांच्यावर गुरंन ६७७/२३ कलम ३९९,४०२,१२०,(बी) प्रमाणे १० डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी दिलिप भागवत, पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे हे करीत आहेत.आरोपीची विचारपूस केली असता दरोडा टाकण्यासाठी अंधाराचा फायदा घेवून लपून बसलो होतो असे बोलताना कबुली दिली.
सदरील आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात शरीरविषयक व मालासंदर्भात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंढे,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले,पोलीस अंमलदार सुधीर कोळसुरे,सिद्धेश्वर जाधव,साहेबराव हाके,योगेश गायकवाड यांनी केली आहे.
0 Comments