*देवणी तालुक्यात कोणत्याही शासकीय निमशासकीय अभिलेखात कुणबी मराठा असलेली एकही नोंद सापडली नाही हे देवणी तालुक्यातील मराठा समाजाचे दुर्दैव* ---
*तहसीलदार गजानन शिंदे*
*देवणी* : मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांना अरक्षणा संदर्भात महाराष्ट्र शासनाने दिलेली मुद्दत दि 24 डिसेंबर रोजी संपत आहे परंतु अरक्षणाचा तिढा प्रशासनाकडून सुटला नाही महाराष्ट्र शासनाने दिलेला शब्द पळाला नाही त्यामुळे मराठा समाजाचे आंदोलने तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाच्या युवकांच्या शांतता बैठका घेत आहेत त्यांचाच एक भाग म्हणून देवणीचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या वतीने शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते शांतता बैठकीस उपस्थितत मराठा बांधवांना मार्गदर्शन करतांना आपल्या देवणी तालुक्यला शांततेचा वारसा आहे आजपर्यंत झालेले आंदोलने शांततेने पार पडली आहेत हे आंदोलन घटनात्मक पद्धतीने पार पडले पाहिजे असे सांगून देवणी तालुक्यातील मराठा समाजासाठी दुर्दैवी बाब ही आहे प्रशासनातील शासकीय निमशासकीय कार्यालयातील सर्व अभिलेखे तपासले परंतु देवणी तालुक्यात कुणबी मराठा असल्याची एकही नोंद सापडली नाही ही सर्व अभिलेखे जुनी असल्यामुळे आपणस काहीही करता येणार नसल्याचे देवणीचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी यावेळी सांगितले
या बैठकीस देवणीचे तहसीलदार गजानन शिंदे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, दिलीप पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल इंगोले पत्रकार रमेश कोतवाल, फकीर बुद्रे उपस्थित होते
यावेळी मराठा समाजातील युवकांचे अरक्षणा विषयी मत मतांतरे ऐकून घेऊन मराठा समाजातील आरक्षणात सहभावी असलेल्या अनेकांने आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या त्यात प्रशांत पाटील दवहीप्परगा, अनिल इंगोले, अंकुश माने,श्रीकांत पताळे इतर काही युवकांने समाजाच्या भावना व्यक्त केल्या ही बैठक यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाचे देवणीचे मंडळाधिकारी अनिता ढगे, तलाठी लक्षीमन कांबळे धनराज भंडारे, यांनी प्रयत्न केले तर सदर शांतता बैठक पोलीस निरीक्षक गुट्टे यांनी आयोजित केल्याने सर्व पोलीस कर्मचारी व तालुक्यातील संपूर्ण ग्रामसेवक उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन सुग्रीव बिरादार यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी केले-
0 Comments