जनार्धन एकनाथ जाधव राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित
उदगीर:जिल्हा परिषद प्रशाला देवर्जन येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले जनार्धन एकनाथ जाधव यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. महात्मा ज्योतिराव फ़ुले शिक्षक परिषदेच्या वतीने दरवर्षी राज्यातील उत्कृष्ट शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.या पुरस्कारासाठी जनार्धन एकनाथ जाधव यांची निवड करण्यात आली होती.२४ डिसेंबर रोजी लातूर येथील कै. दगडोजीराव देशमुख सभागृहात जनार्धन एकनाथ जाधव यांना सहपत्नीक राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.जनार्धन एकनाथ जाधव यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 Comments