वाढवणा पोलीस स्टेशन येथे मराठा समाजाची शांतता कमिटीची बैठक
उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली वाढवना परिसरातील मराठा समाजाची शांतता कमिटीची बैठक घेतली.मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा उभारला आहे.येत्या २४ डिसेंबर पासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आरक्षणासाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत. वाढवणा परीसर हे शांततेचा वारसा आहे.आजपर्यंत झालेले आंदोलने शांततेत पार पडली आहेत.मराठा समाजाचे जे ही आंदोलने होतील ते आंदोलन घटनात्मक पध्दतीने पार पडली पाहिजेत असे बैठकीत बोलताना नमूद केले.यावेळी लक्ष्मीकांत मुळे यांच्यासह वाढवणा परिसरातील मराठा बांधव उपस्थित होते
0 Comments