तोंडार पाटी वळणावर कंटेनरच्या धडकेत दुचाकी स्वारांचे दोन्ही हात व पाय निकामी,कंटेनर चालकांवर गुन्हा दाखल
उदगीर:तोंडार पाटी येथील वळणावर कंटेनरच्या धडकेत दुचाकी स्वारांचे दोन्ही पाय व हात निकामी झाल्याची घटना 13 ऑक्टोबर रोजी घडली होती.याप्रकरणी 11 डिसेंबर 2023 रोजी कंटेनर चालकांवर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तोंडार पाटी जवळील वळणावर 13 ऑक्टोबर रोजी कंटेनर क्रमांक MH 04 GR 1939 च्या चालकाने दुचाकी क्रमांक MH 24 K 9384 ला जोराची धडक दिली या अपघातात माझा मुलगा अक्षय हणमंत गायकवाड वय 27 वर्ष राहणार किणीयल्लादेवी ता. उदगीर याचे दोन्ही हात व पाय निकामी करण्यास कंटेनर चालक कारणीभूत ठरला असी फिर्याद मुलांची आई कुसूमबाई हणमंत गायकवाड यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून कंटेनर चालकांवर गुरंन 679/23 कलम 279,337,338 भादवी प्रमाणे 11 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरसे हे करीत आहेत.
0 Comments