फेसबुक, गुगल, युट्यूब वरील
लैंगिक आजाराची वैयक्तिक माहिती काढल्याने उदगिरात तरुणाची आत्महत्या; ९ मित्रांविरुध्द गुन्हा दाखल...
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर शहरातील एका २५ वर्षीय तरुणाची फेसबुक, गुगल, युट्यूब अकाऊंटवरील लैंगिक आजाराबाबत वैयक्तिक माहिती काढून चिडविले या प्रकरणी अट्राॅसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्री उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात मयताच्या ९ मित्रांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उदगीर येथील संभाजी नगर येथील विक्रम राजेंद्र बलांडे (वय २५ वर्षे) याने राहत्या घरी दि.१९ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी दि.२० नोव्हेंबर रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आ.मृत्यू नोंद क्र.८१/२०२३ कलम १७४ सी.आर.पी.सी प्रमाणे नोंद करण्यात आली होती.
शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्री मयताची आई सत्यशिला राजेंद्र बलांडे रा. संभाजी नगर उदगीर यांनी दिलेल्या जबाबात म्हंटले आहे की, विक्रम हा मृत्यू पुर्वी काही दिवसापासुन मानसिक तणावाखाली दिसत होता त्यास मी विचारले असता त्यांने सांगितले की, त्याचे काही मित्र हे त्यास मानसिक त्रास देत आहेत असे सांगितले होते. मुलाकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याने मित्राला सांगितले होते की त्यास काही दिवसापासुन लैंगिक समस्या उधभवत आहे. त्यावर तो युट्युब वर लैंगिक संमस्येचे निवारणांसाठी व्हिडीआ सर्च करत असतो बाबत मित्राला सांगितले होते त्यावरुन त्याचे मित्र हे त्यास लैगिंक समस्येवरुन चिडवत होते व जाणुन बुजुन त्यास त्रास देत होते.
दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी विक्रमने आत्महत्या करण्यापूर्वी त्याचे स्वअक्षारात दोन चिठ्ठया सोफ्यावर लिहुन ठेवलेल्या आहेत. ज्यामध्ये ९ मित्रांचे नावे लिहलेले असून या ९ मित्रांनी मिळुन विक्रमच्या लैंगिक आजाराबाबत फेसबूक, यूट्यूब, गूगल हॅक करुन माझी पर्सनल माहीती काढुन मला ब्लॅकमेल करुन माझी बदनामी केली आहे व या चिठ्ठीत इतर मजकुर लिहलेला आहे.
वरील ९ मित्रांना माझा मुलगा हिंदू महार जातीचा आहे हे माहीत असुन देखील माझ्या मुलाच्या लैंगिक आजाराबाबत फेसबूक, यूटयूब, गूगल हॅक करुन त्याची पर्सनल माहीती काढुन त्यास ब्लॅकमेल करुन त्याची बदनामी करुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. असा जबाब मयताची आई सत्यशिला राजेंद्र बलांडे रा. संभाजी नगर उदगीर यांनी दिल्यावरुन शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्री उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.६९७/२०२३ कलम ३०६,३४ भादविसह अनु जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम कलम ३(२)(५) नुसार प्रसाद मोरे, शैलेश मारवाडे, रणवीर नटकरे, कौस्तुभ पवार, अभिषेक सताळे, अरविद खोलगाडगे, सचिन खोलगाडगे, ममता खोलगाडगे, अमोल कचरे सर्व रा. उदगीर यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत हे करीत आहेत.
0 Comments