नागपूर विधानभवनात राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी संसदीय अभ्यासवर्गाचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर:विधानभवनात संसदीय संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्य प्रणालीत महाराष्ट्र हे देशात आघाडीवर असून अनेक क्रांतिकारी कायदे या विधिमंडळात झाले आहेत. सदस्यांसह राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि राजकीय विचारवंत, तज्ञ, माध्यमे,सर्वसामान्य जनतेसाठी विधिमंडळ हे प्रेरणेचा आणि ऊर्जेचा एक प्रचंड मोठा जनरेटर आहे, त्यामुळे विधिमंडळ आणि प्रशासनाविषयी जनमानसात आदर वाढविण्यासाठी या अभ्यासवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रक्रिया समजून घेऊन लोकांपर्यंत पोहोचवावी,असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे खजिनदार आमदार ॲड्. आशिष शेलार, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले यांच्यासह राज्यातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थी, अधिव्याख्याता उपस्थित होते.
0 Comments